गुहागरमधील मुंबईवासीय शिवसैनिकांचा उद्या जाहीर मेळावा

477
shivsena-logo-new

गुहागर विधानसभा मतदार संघाच्या मुंबईवासीय शिवसैनिकांच्या जाहीर मेळाव्याचे उद्या बुधवारी आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी या मेळाव्याचे आयोजन केले आहे. परेल पूर्वेकडील शिरोडकर हायस्कूल, हॉलचा तळमजला, के.ई.एम. हॉस्पिटलशेजारी सायंकाळी 5 वाजता हा मेळावा होईल. उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते अनंत गीते, पालक मंत्री रवींद्र वायकर, शिवसेना उपनेते आणि भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक हे मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे आणि जिल्हा निरीक्षक शरद जाधव यांनी केले आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या