राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का, गुजरातमध्ये दोन आमदारांचा राजीनामा

1153

राज्यसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का बसला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला आहे. यापूर्वी मार्च महिन्यात गुजरातमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ 68 वर पोहोचले आहे.

आज तकने याबाबत वृत्त दिले आहे.  अक्षय पटेल आणि  जितू चौधरी हे काँग्रेस पक्षाच्या संपर्कात नाही. या दोघांनी राजीनामा सुपुर्द केला आहे असे पक्षाने म्हटले आहे. तसेच अजून एक आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत आहे असेही काँग्रेस नेत्याने म्हटले आहे.

असे काही तरी होईल असा अंदाज आपण व्यक्त केला होता असे एका काँग्रेस नेत्याने म्हटले आहे. तसेच हे गुजरात राज्य आहे. भाजपने इतर राज्यात अशाच प्रकारे आमदार पळवले आहेत, तर गुजरात तर त्यांचा बालेकिल्ला आहे हे तर होणारच होतं अशी प्रतिक्रिया एका नेत्याने दिली आहे.

गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजीव सातव म्हणाले की हिंदुस्थानात सर्वात मोठे आरोग्य, आर्थिक आणि मानवी संकट आले आहे. तरी भाजप राज्यसभा निवडणुकीसाठी आमदार विकत घेण्यासाठी आपाली सर्व ताकद पणाला लावत आहे. त्यामुळे गुजरात राज्याचे मोठे नुकसान होऊ शकते असेही सातव म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या