मास्क न घालणाऱ्यांना कोरोना सेंटरमध्ये कामाची शिक्षा द्या!

गुजरातेतील सहा जिल्हय़ांमध्ये कोरोनाची परिस्थिती भयंकर आहे. अहमदाबादेत तर गेल्या आठवडय़ात तीन दिवसांची संचारबंदी लावण्यात आली होती. राज्यात कोरोनाचे नियम पाळण्यात येत नसल्यामुळे फैलाव वेगाने होत आहे. गुजरात उच्च न्यायालयाने त्यावर जालीम उपाय शोधून काढला आहे. मास्क न घालणाऱयांना कोरोना सेंटरवर पाच ते पंधरा दिवस काम करण्याची शिक्षा द्या, असे निर्देशच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ व न्यायमूर्ती जे. बी. पर्दीवाला यांच्या खंडपीठाने दिले.

आपली प्रतिक्रिया द्या