गुजरात सरकारनं ‘ड्रॅगन फ्रुट’चं नाव बदललं, नवं नाव ‘कमलम’

dragon-fruit

जगभरात ‘ड्रॅगन फ्रूट’च्या नावाने ओळखले जाणारे फळ आता गुजरातमध्ये नव्या नावाने ओळखले जाणार आहे. गुजरातमध्ये ड्रॅगन फ्रुट हे आता ‘कमलम’ या नावाने ओळखले जाणार आहे. गुजरात सरकारचे म्हणणे आहे की, फळाला ड्रॅगन शब्द वापरणे योग्य वाटत नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले की, ड्रॅगन फ्रूट ‘कमळ’सारखे दिसते, त्यामुळे संस्कृत शब्द ‘कमलम’ हा त्याची योग्य ठरत असून हे नवीन नाव गुजरात सरकारकडून देण्यात आले आहे.

चायनीज ड्रॅगन फ्रूटला गुजरातमध्ये ही नवी ओळख मिळाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये गुजरातच्या कच्छ आणि दक्षिण गुजरातच्या नवसारीच्या आसपासच्या भागातील शेतकरी ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहेत. मोठ्या प्रमाणावर या फळाचे उत्पादन या भागात सुरू आहे.

सरकारचे म्हणणे आहे की फळासाठी ड्रॅगन हा शब्द वापरणे योग्य नाही. म्हणून सरकारने ड्रॅगन फ्रूटचे नाव आता कमलम केले आहे. लाल आणि गुलाबी रंगाच्या या फळाला आता गुजरात मध्ये कमलम नाम देण्यात आले आहे.
यामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे गुजरातमध्ये भाजप मुख्यालयाचे नाव देखील ‘कमलम’ आहे.

गुजरातच्या वन विभागाद्वारे ‘इंडियन काउंसिल ऑफ अॅग्रीकल्चरल रिसर्च’कडे ‘कमलम’ करण्यासाठी एक याचिका दिली आहे. हे फळ कमळासारखे आहे. शेतकरी या फळाला कमळ फळ म्हणून ओळखतात, म्हणून त्याला ‘कमलम’ नाव देण्याची विनंती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जुलाई 2020 या फळाचा उल्लेख आपला कार्यक्रम ‘मन की बात’ मध्ये केलेला होता. मुख्यमंत्री विजय रूपाणी बोलले की राज्य सरकारने ‘ड्रॅगन फ्रूट’चे नाव बदलण्या निर्णय घेतला आहे, कारण याचा बाह्य आकार कमळासारखा आहे. म्हणून त्याला कमलम या नावाने ओळखले गेले पाहिजे.

आपली प्रतिक्रिया द्या