
गुजरातच्या बोटाड येथे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. प्रवासी ट्रेन ट्रॅकच्यामध्ये उभ्या असलेल्या जुन्या लोखंडी ट्रॅकला धडकली. त्यानंतर ती थांबविण्यात आली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. या दुर्घटनेनंतर ट्रेन बरेच तास त्याच ठिकाणी होती.
बोराडच्या पोलीस अधिक्षक किशोर बलोलिया यांनी सांगितले की, बोटाड जिल्ह्यातील रानपुर पोलीस स्टेशनजवळ ओखा भावनगर प्रवासी ट्रेन मध्यरात्री जवळपास तीनच्या सुमारास सीमेंट स्लीपरच्या बाजूला पटरीवर ठेवण्यात आलेल्या चार फुट जुन्या लोखंडी ट्रॅकला धडकली.
पोलीस अधीक्षक किशोर बलोलिया यांनी सांगितले की , ही घटना कुंडली रेल्वे स्टेशनच्या जवळपास दोन किमी दूर झाली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही दुर्घटना घडवून आणल्याचे प्रकरण आहे, मात्र तपास अद्याप सुरु आहे.