केनेस सेमिकॉन कंपनीने गुजरातमधील साणंद येथे 3,307 कोटी रुपयांचे सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मोदी सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातला मिळाला आहे. दिवसाला 6.3 दशलक्ष चिप्स तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असेल. सेमीकंडक्टरचे केंद्र बनण्याच्या दिशेने हिंदुस्थानच्या प्रयत्नांना आणखी एक चालना मिळेल. अनेक तरुणांना रोजगारही मिळेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून केला.