पिस्तूलासह चार काडतुसे बाळगणारा अटकेत, बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बेकायदेशिररित्या गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या परप्रातीय तरूणाला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसे असा 24 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. राकेश त्रिलोकी यादव (वय 31, रा. नांदेड फाटा, मूळ-उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बिबवेवाडी तपास पथक 20 फेब्रुवारीला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोठारी ब्लॉक रस्त्यावरील एका हॉटेलबाहेर कमरेला पिस्तूल लावलेला एकजण उभा असल्याची माहिती पोलीस शिपाई तानाजी सागर यांना मिळाली. त्यानुसार तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी राकेशला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अंगडझडतीत त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि चार जिंवत काडतुसे मिळून आली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगांवकर, शाम लोहोमकर, तानाजी सागर, अमोल शितोळे, अमित पुजारी, सतीश मोरे, श्रीकांत कुलकर्णी, राहूल कोठावळे, अतुल महांगडे यांच्या पथकाने केली.