साफ करायला घेतलेल्या बंदुकीतून गोळी सुटली, भाजप नेत्याचा मृत्यू

1280

लग्नात जाण्यासाठी बंदूक साफ करताना चुकून गोळी लागून भाजप नेत्याचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे ही घटना घडली असून सुरेंद्र मिश्रा असं या नेत्याचं नाव आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरेंद्र मिश्रा हे भिंड जिल्ह्यातील अटेरचे रहिवासी आहेत. ते भाजपचे स्थानिक पदाधिकारी  होते. गेली बरीच वर्षं कुटुंबासोबत ग्वाल्हेर येथे राहत होते. रविवारी सकाळी त्यांना आपल्या मेव्हण्याच्या मुलीच्या लग्नात जायचं होतं. त्यापूर्वी त्यांनी आपली बंदूक साफ करायला घेतली होती.

गेला काही काळ ती बंदूक वापरली गेली नव्हती. मात्र, त्या बंदुकीत काडतूस होती. ते मिश्रा यांच्या लक्षात आलं नाही. त्यांनी न तपासता बंदूक साफ करायला घेतली होती. साफ करत असताना अचानक त्यांच्याकडून ट्रिगर दाबला गेला आणि गोळी सुटली. ती गोळी मिश्रा यांच्या छातीत लागली. गोळीचा आवाज ऐकून त्यांच्या मुलांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली आणि त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

मिश्रा यांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. मिश्रा यांना दाखल करतेवेळीही त्यांचे डॉक्टरांशी मतभेद झाले होते, अशी माहितीही मिश्रा कुटुंबीयांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या