India Pakistan War – पाकिस्तानकडून पुन्हा उरी, पूँछमध्ये गोळीबाराला सुरुवात, जम्मूत अनेक भागात ब्लॅकआऊट

पाकिस्तानकडून उरी व पूँछमध्ये पुन्हा नागरी वस्त्यांवर गोळीबार व उखळी तोफांचा मारा करण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर जम्मू कश्मीरमधील सीमा भागात सायरन वाजले असून ब्लॅकआऊट करण्यात आला आहे. पाकिस्तान नागरी वस्त्यांना टार्गेट करत असल्याने तेथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

बंकरमध्ये आसरा घेण्याचे आवाहन

सीमेलगतच्या भागात विविध ठिकाणी नागरिकांनी बंकरमध्ये आसरा घेतला आहे. घरातून बाहेर पडू नये. सातत्याने सायरन वाजला तरी घाबरून जाऊ नये. तसेच तणावाखाली येऊ नये. कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नये असे आवाहन पेंद्रीय गृहमंत्रालयाने केले आहे. ब्लॅक आऊट झाल्यास तणावाखाली जाऊ नये, गोंधळ करू नये, संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन जम्मू कश्मीरच्या पोलिस महासंचालकांनी कले आहे.