
सूर्यनगरी एक्स्प्रेसमधून गुटख्याचा साठा घेऊन वांद्रे स्थानकात उतरलेल्या एका तस्कराला रेल्वे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले. त्याच्याजवळ चार बॅगांमध्ये भरलेला गुटख्याचा साठा पोलिसांनी जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पथक वांद्रे रेल्वे स्थानकात गस्त घालत असताना सूर्यनगरी एक्स्प्रेमधून एक व्यक्ती चार बॅगा घेऊन संशयास्पदरीत्या उतरताना दिसला. पोलिसांनी त्याच्या बॅगांची तपासणी केली असता त्यात सवा कोटी रुपयांचा गुटखा आढळला. तो गुटखा कोणाला विकणार होता याचा तपास सुरू आहे.