ज्ञानवापी प्रकरण: मुस्लिम पक्षाची याचिका फेटाळली, हिंदू पक्षाच्या नियमित पूजेसाठीच्या याचिकेवर होणार सुनावणी

अलाहाबाद उच्च न्यायालयाने बुधवारी ज्ञानवापी शृंगार गौरी प्रकरणात मुस्लिम बाजूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अंजुमन इंतेजामिया समितीची याचिका फेटाळून लावली. हिंदू उपासकांनी ज्ञानवापीत हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजेसाठी परवानगी देण्याची विनंती केली होती. हिंदू पक्षकारांची ही याचिका सुनावणीसाठी योग्य नसून त्यावर सुनावणी घेऊ नये अशी मागणी करणारी याचिका अंजुमन इंतेजामिया समितीकडून करण्यात आली होती.