हाफीज सईदसहीत पाच दहशतवाद्यांचे बँक खाते सुरू, यूएनएससीने दिली परवानगी

1003

पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जमात-उद-दावा यासारख्या संघटनेत कार्यरत असलेल्या पाच दहशतवाद्यांच्या बँक खात्यांना पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. यात मुंबई हल्ल्याचा मास्टर माईंड हाफीज सईद याच्या बँक खात्याचादेखील समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) विशेष समितीने दिलेल्य परवानगीनंतर ही खाते सुरु करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

पाकिस्तानकडून सुरू करण्यात आलेल्या बँक खात्यांमध्ये हाफीज सईद याच्याशिवाय लष्कर और जमातीचे दहशतवादी सलम भुट्टकी, हाजी एफ अशरफ, याह्या मुजाहिद आणि जफर इक्बाल यांच्या समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. हे सर्वजण यूएनएससीच्या दहशतनवाद्यांच्या यादीत आहेत. या पाच जणांपैकी हाफीजला कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला लाहोर कारागृहातून सोडण्यात आले होते. तर इतर चारही दहशतवादी हे लाहोरच्या कारागृहात 1 ते 5 वर्षांची शिक्षा भोगत आहेत.

या पाचही दहशतवाद्यांनी युएनएससीत बँक खाते सुरु करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांना बँक खाते सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कुटुंब चालविण्यासाठी बँक खाते सुरु करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली होती. विशेष म्हणजे, या पाचही जणांनी केलेल्या अर्जात पाकिस्तान सरकार आपल्या उत्पन्नाचा स्त्राsत असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या