हाजी अली परिसरात साकारतोय कचऱयापासून वीजनिर्मिती प्रकल्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या ‘डी’ विभागातील हाजी अली परिसरालगत असणाऱया 1 हजार 400 चौरस फूट भूखंडावर कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याच्या पालिकेच्या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. यामुळे शहर भागातील कचऱयाच्या विल्हेवाटीचा प्रश्न मोठय़ा प्रमाणात मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प 2021 च्या पहिल्या तिमाहीत कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे. या प्रस्तावित प्रकल्पाची क्षमता ही दररोज 2 मेट्रिक टन कचऱयापासून वीजनिर्मिती करण्याची असून या प्रकल्पातून दरवर्षी 1 लाख 82 हजार युनिट एवढी वीजनिर्मिती होईल असा अंदाज आहे.

पालिपेच्या गुरुवारी झालेल्या एकदिवसीय स्वच्छता मोहिमेअंतर्गत सदर प्रकल्पाची पाहणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी सह आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) आनंद वागराळकर, संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पालिका क्षेत्रातील स्वच्छता अधिकाधिक प्रभावी व लक्षणीय व्हावी यासाठी पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन खाते व महापालिकेचे सर्व 24 प्रशासकीय विभाग सातत्याने कार्यरत असतात. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या क्षेत्रात एकदिवसीय विशेष जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. लोकप्रतिनिधीच्या सहभागाने राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पालिकेच्या कामगार-कर्मचारी-अधिकारी यांच्यासह नागरिकांही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन खात्याशी संबंधित विविध पंत्राटी संस्थांनीही सहभाग घेतला. त्याचबरोबर या एकदिवसीय मोहिमेदरम्यान घनकचरा व्यवस्थापनाशी संबंधित अत्याधुनिक स्वरूपाची विविध यंत्रसामुग्रीदेखील प्रभावीपणे उपयोगात आणण्यात आली.

स्वच्छता अभियानात 2 हजार 780 टन कचरा जमा

पालिका क्षेत्रातील स्वच्छताविषयक कार्यवाही अधिकाधिक प्रभावीपणे राबविली जावी, या कार्यवाहीत लोकसहभाग वाढावा आणि पर्यायाने आपली मुंबई अधिकाधिक स्वच्छ रहावी या उद्देशाने पालिका क्षेत्रात गुरुवारी एकदिवसीय विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या विशेष मोहिमेत 15 हजार 230 महापालिका कर्मचाऱयांसह 2 हजार 884 स्वयंसेवकदेखील सहभागी झाले होते. याअंतर्गत दिवसभरात 2 हजार 780 टन कचरा संकलित करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेला मुंबई पोलीस दलाचेदेखील सहकार्य लाभले.

पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मोहिमेअंतर्गत पालिकेच्या सर्व 24 विभागांच्या कार्यक्षेत्रातील रुग्णालये, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव आणि स्वच्छतागृहे, प्रसिद्ध पर्यटनस्थळे, भाजी मंडई, वाणिज्यिक क्षेत्रे, उड्डाणपूल, चौपाटय़ा, रस्ते इत्यादी ठिकाणांची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली.