
इस्रायल आणि हमास यांच्यात शेकडो पॅलिस्टिनींना सोडवण्यासाठी ताब्यात असलेले मृतदेह सोपवण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या करारानुसार, उद्या गुरुवारी चार मृत इस्रायली नागरिकांचे मृतदेह सोपवणार आहे. इस्रायलने हमासकडून ओलिसांच्या सुटकेसाठी आणि त्यांच्यासोबत करण्यात आलेल्या क्रूर व्यवहाराच्या विरोधात शनिवारी जवळपास 600 पॅलिस्टिनी कैद्यांची सुटका करण्यास विलंब केला होता. यावर हमासने म्हटले होते की, हा विलंब म्हणजे संघर्षविरामाचे गंभीर उल्लंघन आहे. जोपर्यंत पॅलिस्टिनींची सुटका केली जात नाही, तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील चर्चा होण्याची शक्यता नाही.
इस्रायलकडून सीरियात विध्वंस
इस्रायलच्या हवाई दलाने मंगळवारी रात्री उशिरा सीरियाची राजधानी दमास्कमस्ध्ये दक्षिणेकडील भागात हवाई हल्ले केले. सीरियातील दहशतवादी संघटनांकडून दक्षिण सीरियामध्ये इस्रायली सैन्याविरोधात कारवाया सुरू होत्या. त्या रोखण्यासाठी व बफर झोनचे उल्लंघन थांबवण्यासाठी आम्हाला हा हवाई हल्ला करावा लागला, असे इस्रायली सैन्याने म्हटले आहे.