हमासचा नेता याह्या सिनवार याचा इस्रायली सैन्याने गाझामध्ये केलेल्या कारवाईत खात्मा झाल्याचे वृत्त आहे. तिघांचे मृतदेह हाती लागले असून यात सिनेवार याचा समावेश आहे की नाही याची पडताळणी सध्या इस्रायल करत आहे. त्यासाठी डीएनए चाचणीही करण्यात येत असल्याचे इस्रायली सैन्याने स्पष्ट केले आहे. हमासनेही याह्या सिनेवार मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.
इस्रायलचा गाझातील शाळेवर हल्ला
इस्रायलकडून गाझापट्टीत हल्ले सुरुच असून आज इस्रायलने गाझामधील एका शाळेवर हल्ला घेतला. याठिकाणी पॅलेस्टिनींनी आसरा घेतला होता. हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झाला असून यात पाच मुलांचा समावेश आहे. अशी माहिती गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.