नववर्षाचे स्वागत व्हॉट्सअॅप स्टिकर्सने

whatsapp-stickers

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सण आणि शुभेच्छा हे समीकरण लक्षात घेऊन काही महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅपने स्टिकर्सना सुरुवात केली होती. त्यामुळे जगभरात नववर्षाच्या शुभेच्छा एकमेकांना देताना व्हॉट्सअॅपच्या स्टिकर्सचा जास्तीत जास्त वापर झाल्याचे पाहायला मिळाले.

प्लेस्टोअर्सवर उपलब्ध असलेल्या व्हॉट्सअॅप स्टिकर्सवर ग्राहकांना स्टिकर्स कस्टमाईज करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असे स्टिकर्स 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी शेअर करण्यात आले आहेत. व्हॉट्सअॅपने 12 स्टिकर्स आधीच दिले होते. मात्र अधिक स्टिकर्स प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करता येत असल्याने या स्टिकर्समध्ये वैविध्य पाहायला मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या