
सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली
‘टीम इंडिया’चा फिरकी गोलंदाज हरभजन सिंगच्या नावाची पंजाब सरकारने ‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी शिफारस केली होती, मात्र मुदतीमध्ये ही शिफारस न आल्याने क्रीडा मंत्रालयाने भज्जीची शिफारस फेटाळली. त्यामुळे यू टय़ूबवर एक व्हिडीओ टाकून भज्जीने पंजाब सरकारच्या हलगर्जीपणावर टीकास्त्र सोडले.
भज्जी म्हणाला, यावेळी मला ‘खेलरत्न’ पुरस्कार मिळेल अशी आशा वाटत होती, मात्र शिफारस अर्जच मुदतीनंतर गेल्याने तो फेटाळणे साहजिकच आहे. पंजाब सरकारच्या या दिरंगाईमुळे मी निराश झालो आहे.




























































