एसी लोकलमुळे ‘हार्बर’च्या वेळापत्रकाचा बोजवारा; प्रवाशांमध्ये संताप, नोकरदारांना ‘लेटमार्क’

प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवर सुरू केलेल्या एसी लोकलने नियमित ट्रेनचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. एसी लोकलमुळे प्रवाशांना दिलासा मिळण्याऐवजी उशिराच्या प्रवासाची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी दिवसभर बहुतांश लोकल ट्रेन 20 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या. परिणामी, नोकरदारांना कामावर पोहोचण्यास उशिर झाला. रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाचा फटका बसल्याची संतप्त प्रतिक्रिया अनेक प्रवाशांनी नोंदवल्या, तर अनेकांनी रेल्वे प्रशासनाकडे आपल्या तक्रारी मांडल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते पनवेल मार्गावर सोमवारी एसी लोकलची सेवा सुरू करण्यात आली. या ट्रेनच्या दिवसभरात 14 फेऱया चालवण्याचे ठरवून मध्य रेल्वेने नियमित लोकलच्या जागी एसीच्या फेऱयांचे नियोजन केले. त्याचा संपूर्ण लोकलसेवेवर परिणाम झाला. एसी लोकलमुळे नियमित गाडय़ांच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. कुर्ला, गोवंडी, मानखुर्द, वाशी तसेच त्यापुढील स्थानकांत मंगळवारी सकाळी प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. गाडय़ा वेळेवर न धावल्याने नोकरदारांची अर्धा ते पाऊण तास रेल्वे स्थानकांत रखडपट्टी झाली.

सरकारकडून दिशाभूल, सामान्य प्रवाशांचे हाल

एसी लोकलची सेवा साध्या लोकलच्या तिकीटदरात उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र प्रत्यक्षात एसी लोकलचा महागडा प्रवास माथी मारला जात आहे. ‘नॉन एसी’ फेऱयांच्या जागी एसी लोकलच्या फेऱया चालवून सामान्य प्रवाशांचे हाल केले जात आहेत. सरकारने दिशाभूल केल्याचेच यातून स्पष्ट होत आहे, अशी नाराजी नियमित प्रवासी दिनेश नाईक यांनी व्यक्त केली.

Harbor Line Commuters Fuming as AC Local Disrupts Train Schedule

Mumbai Harbor Line train schedule collapsed after the introduction of AC locals. Commuters face 20-30 minute delays, leading to office late marks and anger.