रेल्वे रुळाला फडके बांधून लोकल चालवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

रेल्वे प्रशासनाने आज हजारो मुंबईकरांचा जीव धोक्यात घातला. मानखुर्द येथे रेल्वे रुळाचा तुकडा पडला. परंतु लोकलसेवा पूर्णपणे बंद ठेवून रुळाचे हे फ्रॅक्चर दुरुस्त करण्याऐवजी रेल्वे प्रशासनाने या ठिकाणी चिंधी बांधली. विशेष म्हणून यावरून लोकल धावलीही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने हजारो मुंबईकर प्रवाशांच्या जिवाशी खेळ केल्याचे उघड झाले. एका वृत्तवाहिनीच्या बातमीनंतर हार्बर मार्गावरील हा रेल्वे रूळ दुरुस्त करण्याच्या कामाला सुरुवात झाली, परंतु रेल्वे प्रशासनाच्या या अक्षम्य दिरंगाईबद्दल प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.