
सामना ऑनलाइन ,लंडन
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांडय़ा सध्या चांगलाच बहरात आहे. त्यामुळे तो यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी आणि फलंदाजीत चमत्कार घडवू शकतो असा विश्वास हिंदुस्थानचे माजी यष्टिरक्षक आणि माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी व्यक्त केला आहे. हार्दिक डेथ ओव्हर्समध्ये प्रतिस्पर्धी संघांसाठी अतिशय धोकादायक फलंदाज ठरू शकतो. कारण आता तो परिपक्व झाला असल्याने संघासाठी मोठी किमया साधण्याची क्षमता त्याच्यात नक्कीच आहे, असेही मत मोरे यांनी व्यक्त केले.



























































