देशद्रोहाच्या आरोपावरून हार्दिक पटेल यांना अटक

383

काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांना देशद्रोहाच्या आरोपावरून शनिवारी रात्री अटक करण्यात आली. अहमदाबादच्या  विरमगाव येथून त्यांना अटक करण्यात आली.

गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अहमदाबादमध्ये 2015साली काढण्यात आलेल्या रॅलीदरम्यान हिंसाचार उसळला होता. यात सार्वजनिक मालमत्तेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या प्रकरणात हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी पटेल यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणातील खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरोधात अहमदाबादच्या न्यायालयाने काल अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या