
सामना ऑनलाईन, मुंबई
युवराज नटाळकरचे दमदार अर्धशतक आणि अर्जुन दाणी व साहील जाधवने केलेल्या महत्त्वपूर्ण खेळींच्या जोरावर डॉन बॉस्को हायस्कूल संघाने हॅरीस शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील आजपासून सुरू झालेल्या लढतीत अल बरकत एमएमआय इंग्लिश स्कूलवर वर्चस्व गाजवले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या डॉन बॉस्को हायस्कूलने 7 बाद 250 धावसंख्या उभारली. युवराज नटाळकरने 147 चेंडूंत 13 चौकारांसह 78 धावांची खेळी साकारली. अर्जुन दाणीने दोन चौकारांसह 34 धावांची आणि साहील जाधवने चार चौकारांसह 37 धावांची खेळी केली.






























































