पुणे जिल्ह्यातील इंदापूरमधील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील राजकारणामुळे नाराज होते. त्यामुळे त्यांनी ‘तुतारी’ हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. हर्षवर्धन पाटील सोमवारी 7 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट करत सांगितले.
राज्याचे माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी स. १०…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 4, 2024
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीटरवर पोस्ट करत हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशा संदर्भात माहिती दिली, ते म्हणाले की, “राज्याचे माजी मंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवार दि. 7 ऑक्टोबर 2024 रोजी स. 10 वा. त्यांचा पक्ष प्रवेश होईल.” असे जयंत पाटील म्हणाले.