
भाजपा महायुतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातकडे गहाण ठेवला आहे. देवेंद्र फडणवीस हे शॅडो मुख्यमंत्री असून महाराष्ट्रातील सर्व निर्णय हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेच घेतात. त्यामुळे सर्व छोटय़ा मोठ्या कुरबुरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात, अशी टीका काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन दिवसापूर्वीच शाह यांना भेटले होते, त्यानंतर पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यातून क्लिन चिट देण्यात आली. गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये अंतर्गत टोळी युद्ध सुरु आहे आणि त्यातून नेहमी दिल्लीत जावे लागते, असे सपकाळ नागपुरमध्ये माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.


























































