मेरठमध्ये सुरू असलेल्या शेतकरी मेळाव्यात एक रेडा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ‘अनमोल’ असे रेड्याचे नाव असून तो नावाप्रमाणे खूप अनमोल आहे. त्याची किंमत 23 कोटी रुपये आहे. सिरसा येथील पलविंदर सिंह यांच्या मालकीचा हा रेडा आहे. हरयाणाचे शेतकरी नरेंद्र सिंह यांच्याकडे असलेल्या ‘विधायक’ आणि ‘गोलू टू’ या दोन रेड्यांची किंमत 20 कोटी आणि 10 कोटी रुपये आहे. खास जातीचे हे रेडे असून उच्च प्रतीच्या वीर्यासाठी ओळखले जातात. त्यांच्यापासून चांगल्या प्रतीच्या रेड्यांची पैदास होते. सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात तीन दिवसांचा शेतकरी मेळावा सुरू आहे. शेतकरी मेळाव्यात लोक रेडे बघण्यासाठी गर्दी करत आहेत. शेतकरी पलविंदर सिंह म्हणाले, माझ्याकडे असलेला अनमोल रेडा आठ वर्षांचा आहे. हा मुर्रा जातीचा शुद्ध रेडा आहे. त्याच्या खाण्यापिण्याचा मोठा थाट असतो. त्याला ऋतुमानानुसार काजू, बदाम, छोले खायला दिले जातात. त्याच्या खाण्यावर दिवसाला 1500 रुपये खर्च येतो. हरयाणाचे शेतकरी नरेंद्र सिंह यांच्याकडील 20 कोटी रुपये किमतीचा रेडा आहे. रेड्याच्या वीर्य विक्रीतून ते चांगली कमाई करतात. चांगल्या जातीच्या रेड्यांची पैदास व्हावी, असे त्यांना वाटते. शेतकरी मेळाव्यात अनेक लोक दूरवरून रेडे पाहण्यासाठी येत आहेत.
कधीच विकणार नाही
रेड्याला कितीही मोठी बोली लागली तरी तो विकणार नाही, असा निर्धार त्याचे मालक पलविंदर सिंह यांनी केला आहे. तो इतर रेड्यांपेक्षा जास्त चपळ आहे. मला तो इतका आकडतो की मी त्याला सोडू शकत नाही. मी त्याला माझ्याबरोबर सर्वत्र घेऊन जातो. मी स्कतŠ त्याची काळजी घेतो. चाराही मी स्वतः पुरवतो, असे पलविंदर यांनी सांगितले. या महागड्या रेड्याच्या मालकांनी त्यांच्यासाठी खास एसी व्हॅन बनवली आहे. रेड्यापासून दूर राहणे शक्य नाही, रेड्याला विकायचा प्रश्नच येत नाही, असे पलविंदरने म्हटले.