
हरयाणामध्ये एक अनोखी घटना घडली आहे. एका दाम्पत्याला एक दोन नव्हे तर तब्बल 10 मुलींनंतर मुलगा झाला आहे. मुलगा झाल्यामुळे या दाम्पत्याच्या आनंदाला पारा उरलेला नाही. त्यांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांनी परिसरात पेढे वाटून जल्लोष व्यक्त केला आहे.
हरयाणातील जींद येथील उचाना गावातील आहे. या दाम्पत्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी महिलेची 11 वेळा प्रसूती झाली आहे. दहा मुलींनंतर तिला 11वे अपत्य मुलगा झाला आहे. महिलेची डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे. दरम्यान महिलेच्या अंगात 5 ग्रॅम रक्त होते आणि डिलिव्हरीमध्ये थोडी जोखीम होती. मात्र आता आई आणि मुलाची प्रकृती स्थीर आहे. महिलेच्या पतीने सांगितले की, त्यांच्या लग्नाला 19 वर्ष झाली.सध्या त्यांची सर्वात मोठी मुलगी बारावीला शिकत आहे. मी थोडंफार कमवतो पण सर्व मुलींना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सांगितले.





























































