एका दिवसात दोन मंत्री कोरोनाग्रस्त, नितीन राऊत, हसन मुश्रीफ पॉझिटिव्ह

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील कोरोनाबाधित मंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी सकाळी ट्विट करत आपला कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. त्यापाठोपाठ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनाही त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. या दोन्ही मंत्र्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वत:ची कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

राज्यात यापूर्वी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. या सर्वांनी कोरोनावर मात केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या