परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे – हसन मुश्रीफ

469
NCP mla Hasn Mushrif with his red car

सरकारने जमाबंदीचे आदेश दिले आहेत. त्याचे नागरिकांनी काटेकोर केलेच पाहिजे. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार खंबीर आहे, असे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. आपला लढा कोरोनासाराख्या झपाट्याने फैलावणाऱ्या रोगाशी आहे. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. लॉक डाऊन आणि आरोग्य विभागाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास आपण या रोगावर मात करू शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्यात कलम 144 लागू झाले असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली होती, त्यानंतर ते बोलत होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले की, कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व उपाययोजना करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः आढावा घेऊन नागरिकांना आवाहन करत आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. याचा फटका अमेरिकी, इटलीसारख्या देशांना बसला आहे. या रोगावर अद्याप औषध किंवा लस नसल्याने खबरदारी घेणे आणि रोगाला प्रतिबंध करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ही परिस्थिती ओळखून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत 261 जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 256 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. गरज भासल्यास सर्व मेडिकल कॉलेज तसेच वैद्यकीय संस्था याठिकाणी दोन ते तीन हजार जणांना ठेवता येईल अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या