हसीन जहांने दिल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा, कट्टरपंथींकडून बलात्कार व हत्येची धमकी

2040

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहां बऱ्याच काळापासून पतीपासून विभक्त राहात आहे. मात्र या ना त्या कारणामुळे ती नेहमीच चर्चेत असते. कधी आपला डान्सचा व्हिडीओ शेअर करते तर कधी बोल्ड फोटोशूट करून सोशल मीडियावर आग लावते. आताही तिने राम मंदिर भूमिपूजनाच्या शुभेच्छा दिल्याने वाद ओढवून घेतला असून कट्टरपंथी लोकांच्या निशाण्यावर आली आहे.

बुधवारी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावर हसीन जहांने एक पोस्टर शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या. हसीन जहांने शेअर केलेल्या फोटोत प्रभू श्रीराम आणि प्रस्तावित राम मंदिराचा फोटो दिसत आहे. या फोटोसोबत हसीनने, अयोध्येत राम मंदिर भूमीपूजनासाठी सर्व हिंदू समाजाला शुभेच्छा, असे कॅप्शन दिले. असे केल्याने ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली असून कट्टरपंथी चाहत्यांनी तिला बलात्कार करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे.

jai-sri-ram

पतीवरील आरोपांमुळे आली चर्चेत
2018 ला हसीन जहां (Hasin Jahan) हिने पती मोहम्मद शमी याच्यावर केलेल्या आरोपांमुळे खळबळ उडाली होती. तिने शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता, तसेच शमीच्या भावावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. तसेच शमीचे अनेक महिलांशी संबंध असल्याचाही आरोप तिने केला होता, मात्र यात तथ्य आढळले नव्हते. बीसीसीआयने देखील शमीला क्लिन चिट दिली होती.

आपली प्रतिक्रिया द्या