शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन म्हणते, माझी फक्त हिच इच्छा आहे की…

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 मध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने हॅटट्रिक घेत आपल्या नावाची इतिहासात नोंद केली. चेतन शर्मा यांच्यानंतर वर्ल्डकपमध्ये हॅटट्रिक घेणारा शमी फक्त दुसरा हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. शमीच्या हॅटट्रिकच्या बळावर टीम इंडिया 224 धावांचा बचाव करू शकला आणि अफगाणिस्तानवर 11 धावांनी विजय मिळवला. या लढतीत शमीने एकूण 4 बळी घेतले. शमीच्या या कामगिरीवर पत्नी हसीनने दिलखुलास प्रतिक्रिया दिली आहे.

शमीच्या हॅटट्रिकनंतर पत्नी हसीन जहांला याबाबत विचारले असता ती म्हणाली की, ‘देशासाठी खेळणे ही प्रत्येक खेळाडूसाठी गर्वाची गोष्ट असते आणि सामना जिंकून देणे ही आणखी चांगली गोष्ट आहे. माझी इच्छा आहे की टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकावा.’ हसीनने शमीबाबत अधिक काही न बोलता टीम इंडियाला जर वर्ल्डकप जिंकायचा असेल तर अशीच कामगिरी कायम ठेवावी लागेल, असे म्हटले.