बर्ड फ्लूचा धोका दिसताच तडकाफडकी निर्णय; हिंदुस्थानसह 40 देशांतील अंडी, चिकनवर सौदीची बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सौदी अरबने हिंदुस्थानसह 40 देशांतील पोल्ट्री प्रोडक्ट म्हणजेच अंडी आणि चिकनच्या आयातीवर बंदी घातली आहे. सौदी फूड अँड ड्रग्ज अॅथोरिटी (एसएफडीए) ने यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. सौदीतील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. अंडी आणि चिकनुळे बर्ड फ्लूचा धोका वाढल्याने चिकन व अंडय़ांना सौदीत नो एण्ट्री करण्यात आली आहे.

सौदीमध्ये 2004 पासून काही देशांतील चिकन आणि अंडय़ांच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. आता या देशांसोबत अन्य काही देश नव्याने जोडले आहेत. यात हिंदुस्थानचाही समावेश आहे. सौदीने स्पष्ट सांगितले आहे की, जोपर्यंत पोल्ट्री मांस किंवा त्यासंबंधित उत्पादनाला प्रोसेसिंग केले जात नाही. तोपर्यंत आयातीला सूट दिली जाणार नाही.

कोणकोणत्या देशांचा समावेश

सौदी अरबने ज्या 40 देशांवर बंदी घातली आहे, त्यात हिंदुस्थान, अफगाणिस्तान, अझरबैजान, जर्मनी, इंडोनेशिया, इराण, बोस्निया, हर्जेगोविना, बुल्गारिया, बांगलादेश, ताइवान, जिबूती, दक्षिण आफ्रिका, चीन, इराक, घाना, पॅलेस्टिन, व्हिएतनाम, पंबोडिया, कजाखस्तान, पॅमरून, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, लीबिया, म्यानमार, युनायटेड किंगडम, मिस्र, मेक्सिको, मंगोलिया, नेपाळ, नाइजर, नाइजीरिया, हाँगकाँग, जपान, बुर्किना फासो, सूडान, सर्बिया, स्लोवेनिया, आइवरी कोस्ट आणि मोंटेनेग्रो या देशांचा समावेश आहे.