पुष्पा कोळी यांचे नगरसेवकपद अडचणीत; जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश

315
bmc

मुंबई महापालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेसच्या नगरसेविका पुष्पा कोळी यांचे नगरसेवकपद अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. खोटे जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून याप्रकरणी हायकोर्टाने 16 डिसेंबरपर्यंत पुष्पा कोळी यांना जात प्रमाणपत्र व त्यासंदर्भातील कागदपत्रे कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पुष्पा कोळी या वॉर्ड क्र 181 च्या विद्यमान नगरसेविका आहेत. इतर मागासवर्गाच्या महिलांकरिता राखीव असलेल्या वॉर्डातून त्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. पुष्पा कोळी या कोळी जातीच्या असून माळी जातीच्या प्रमाणपत्रावर त्यांनी निवडणूक लढवली. इतर मागासवर्गात कोळी जात मोडत नसल्याने शिवसेनेच्या पराभूत उमेदवार माधुरी ढोके आणि अपक्ष उमेदवार अकिला पेजे यांनी ऍड. एन. एन. गवाणकर यांच्यामार्फत याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावेळी हायकोर्टाने पुष्पा कोळी यांना जातीचे प्रमाणपत्र व त्याबाबतचे कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिले व सुनावणी 16 डिसेंबरपर्यंत तहकूब केली.

आपली प्रतिक्रिया द्या