
एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर एचडीएफसी बँकेने एफडी, आरडी तसेच बचत खात्यावर मिळणाऱया व्याजदरात मोठी कपात केली आहे. बँकेने एफडीवर 25 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. बचत खात्यावरील व्याजदरातही 50 बेसिस पॉइंट्सने कपात केली आहे. हा निर्णय 10 जून 2025 पासून लागू करण्यात आला आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय कॅनरा बँक आणि कोटक महिंद्रा बँकेनेही व्याजदरात कपात केली.