Health Tips- सर्दी-खोकल्यामुळे त्रस्त असाल तर, करुन बघा हे घरगुती रामबाण उपाय

ऑक्टोबर महिना म्हंटलं की गरमीचे दिवस होतात. मात्र या उकाड्याच्या दिवसातही पावसाने थैमान घातलं आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडला की लगेचच दोन दिवस प्रचंड उकाडा जाणवतो. त्यामुळे वातावरणातील या सततच्या बदलामुळे अनेक आजार सध्या डोक वर काढतायत. आणि यामध्ये प्रामुख्याने सर्दी खोकला होणे स्वाभाविक आहे. त्यामुळे यावर घरगुती उपायच फायद्याचे ठरतात.

त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाबजल वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

सध्या वातावरणात होणारे बदलांमुळे सर्दी खोकला यांसारखे व्हायरल आजार वाढत आहेत. यावर काही जुन्या पद्धतीचे घरगुती उपाय करणे केव्हाही फायद्याचे आहे. यापैकी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुळस आणि आल्याचा काढा. तुळशीच्या पानांचा आणि आल्याचा रस काढून त्यात मध मिसळून तयार केलेला काढा प्यायल्याने तुमचा खोकला तसेच सर्दीही बऱ्याच प्रमाणात कमी होते आणि तिम्हाला आराम मिळतो.

तुळस आणि आले हे दोन्ही आयुर्वेदात महत्त्वाचे घटक मानले गेले आहेत. या दोन्हींचे मिश्रण अनेक आरोग्यदायी फायदे देते.

आहारामध्ये कडधान्य समाविष्ट करताना या टिप्सचा वापर करा, वाचा सविस्तर

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी (Immunity Booster)
तुळस आणि आले दोन्ही अँटीऑक्सिडंट्स आणि दाह-विरोधी (anti inflammatory) गुणधर्मांनी समृद्ध आहेत. हे मिश्रण शरीराला संसर्ग आणि आजारांशी लढण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार
तुळस आणि आले हे मिश्रण सर्दी, खोकला, कफ आणि घसादुखीवर एक उत्तम घरगुती उपाय आहे.

हळद घसा आणि श्वसनमार्गातील सूज (inflammation) कमी करते, ज्यामुळे खोकल्यापासून आराम मिळतो. रोज रात्री हळदीचं दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजारी पडण्याचा धोका कमी होतो. गरम दूध घशाला आराम देते आणि रात्री शांत झोप लागण्यास मदत करते.

आहारात पालक सूप पिण्याचे होतील अगणित फायदे, वाचा

गरम पाणी आणि हळद एकत्र करून प्यायल्याने छातीत आणि घशात जमा झालेला कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते.

कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या केल्यास घशाला आराम चांगला मिळतो. घशात जमा झालेला कफ कमी करण्यास मदत होते. गरम पाणी प्यायल्याने घशातील जीवाणू मरतात.