पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्याल….वाचा

सामना ऑनलाईन। मुंबई

नुकताच पावसाळा सुरू झाला आहे. या दिवसात वातवरणात सतत बदल होत असतात. पण या वातावरणातील बदलांचा आपला त्वचेवरही परिणाम होतो. यामुळे काळजी घेणे गरजेचे असते. त्यातच पावसाळ्यात सतत भिजल्याने त्वचेवरही परिणाम होतो. साचलेल्या पाण्यातून जातानाही त्वचासंसर्ग होऊ शकतो. हे टाळायचे असेल तर काळजी घेणे आवश्यक आहे.

health

पावसाळ्यात आपली त्वचेची काळजी घ्यावी लागते. आपली त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या काही टिप्स
वातावरणातील आद्रतेमुळे त्वचा ओलसर असते. यामुळे या दिवसात सनस्क्रीन लावणे टाळावे.
पावसाळ्यात जास्त मेकअप करणे टाळावे. वॉटरप्रुफ मेकअपचा वापर करणे उत्तम.
ब्लीच आणि फेशियल करणे टाळा कारण चेहऱ्यावरील त्वचा खरखरीत होण्याची शक्यता असते.
रात्री झोपण्यापूर्वी ओठांना दुधाची मलई लावा. गडद रंगाची लिपस्टीक वापरणे टाळा. ओठ फुटल्याचे जाणवल्यास त्यावर नारळाच्या तेलचा वापर केल्यास उत्तम.
कडुलिंबाची पाने अंघोळ करताना गरम पाण्यात टाकून आंघोळ करा. त्याने आपल्याला ताजेतवाने आणि निरोगी राहण्यास मदत होते.
health1

केसांची काळजी कशी घ्याल ?
शरीराबरोबरच केसांची काळजी घेणे देखील महत्तवाचे आहे. त्याच संबंधी काही टिप्स –
शक्यतो आपण पावसात भिजणे टाळावे कारण त्याने आपले केस खराब होण्याची शक्यता जास्त असते.
जर केस ओले झाले असतील तर लगेच कोरडे करावे.
शॅम्पू नंतर कंडीशनर वापरावा त्याने केस सिल्की राहण्यास मदत होते.
रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेलाचे मालिश करुन झोपावे.
केसांना कलर करणे शक्यतो टाळा कारण त्याने केस गळण्याची दाट शक्यता असते.
हर्बल शैम्पूचा वापर करणे चांगले.
केस हेअर ड्रायरणे केस सुकवणे टाळा टॉवेल ने केस कोरडे करा.

पावसाळ्यातील आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काही टिप्स
पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. पावसाळ्यात अनेक रोग पसरण्याची शक्यता जास्त असते. आपण खाल्लेल्या अन्नातून अनेक आजार होण्याची
शक्यता असते. आणि रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.

health-2

चांगले आरोग्यासाठी काही टिप्स
पावसाळ्यात मुबलक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याने त्वचा देखील कोरडी होत नाही.
सर्व फळे आणि भाज्या, धुवून मगच खा.
शरीर उबदार ठेवा कारण शरीरातील तापमान कमी झाल्यास व्हायरल फ्ल्यु होण्याची शक्यता आहे.
सूप आणि गरम केलेले अन्न खावे. ते आपल्या त्वचेस पोषक आहे.
लसूण, मिरपूड, आले, हळद, जिरा पावडर आणि धणे आपल्या आहारात समाविष्ट केल्याने अपचन होण्याची शक्यता कमी होते. आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
शरीराची स्वच्छता ठेवा आणि उघड्यावरचे अन्न टाळावे. त्याने आजार होण्याची शक्यता असते.
निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा.

आपली प्रतिक्रिया द्या