टिप्स – कच्चा कांदा

 • कच्चा कांदा हा पोट साफ करण्यासाठी मदत करतो. बद्धकोष्ठता असणाऱया लोकांनी कच्चा कांदा अवश्य खावा.
 • कांदा, मध आणि खडीसाखर एकत्र मिक्स करून खाण्यामुळे पोटाशी संबंधित रोग बरे होतात.
 • सर्दीचा त्रास होत असल्यास एका कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिक्स करून दिवसातून 2-3 वेळा चाटल्याने सर्दी दूर होते.
 • चेहऱयावरील काळे डाग दूर करण्यासाठी कांद्याचा रस लावल्याने काळेपणा दूर होतो आणि चेहऱयाची चमक वाढते.
 • टक्कल पडले असल्यास कांद्याचा रस त्या ठिकाणी लावून मालीश केल्यास केस परत येतात आणि केस गळणे थांबते.
 • थंडीत पायांना भेगा पडण्याचा त्रास अनेकांना होतो अशावेळी कच्चा कांदा वाटून टाचेवर बांधल्याने टाचांच्या भेगा ठीक होतात.
 • सर्दी किंवा कफाचा त्रास होत असल्यास ताजा कांद्याचा रस गूळ व मध टाकून प्यायल्यास ही समस्या दूर होते.
 • कच्चा कांदा खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रणात राहतो. यात मिथाईल सल्फाईड आणि अमिनो ऍसिड असते. हे कोलेस्टेरॉलही नियंत्रणात ठेवते. तसेच हृदयाच्या तक्रारींना दूर ठेवते.
 • रोज कांदा खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते. यामुळे ऍनिमियाही नाहीसा होतो.
 • कोणत्याही कारणाने बेशुद्ध पडलेल्या माणसाला कांद्याचा वास दिल्यास तो माणूस शुद्धीवर येतो.
 • दुपारच्या जेवणात कोशिंबिरीमध्ये कांद्याचा समावेश केल्यास पचनप्रक्रिया सुधारण्यास तसंच श्वसनाशी संबंधित आजार दूर राहण्यास मदत मिळते.
आपली प्रतिक्रिया द्या