
आपण आज पुन्हा जुन्या पद्धती, जुनी उपकरणे याकडे ओढले गेलो आहोत. मातीच्या भांड्यात अन्न शिजवणे ही पूर्वी काळाची गरज होती. पण आज टी एक जाणीवपूर्वक केलेली आरोग्यदायी गोष्ट आहे. बिर्याणी, कुल्फी, चहा अशा अनेक गोष्टीना मातीचा सुवास लागतो त्याची त्याची चव अजूनच खमंग, खरपूस होते. त्यामुळे रोजच्या स्वयंपाकातही मातीच्या भांड्यांचा वापर केला जातो. शिवाय मातीतील अंगभूत जीवनसत्वेही त्यात उतरतात.
मातीची भांडी साफ करण्यासाठी काही टिप्स.
- मातीची नवी मोठी भांडी १२ तास पाण्यात भिजत ठेवावीत.
- छोटी भांडी सहा तास पाण्यात भिजत ठेवावीत. दुसऱ्या दिवशी भांडे कोमट पाण्याने धुवावे.
- भांडी धुतल्यावर उन्हात वाळवून बाहेरच्या बाजूने त्यांना गोडे तेल लावा. आणि त्यात पाणी घालून मध्यम आचेवर गरम करा. यानंतर भांडे स्वयंपाकाला वापरा.
- सर्वसाधारणपणे काळ्या किंवा लाल मातीची भांडीच विकत घ्या.
- गरम मातीचे भांडे फ्रीजमध्ये ठेवू नका. त्याला तडे जाण्याची शक्यता असते.
- अन्न परतण्यासाठी लाकडी चमच्याचा वापर करा.
- मातीचा तवा वापरत असाल तर तो गरम करण्यापूर्वी त्याला पाणी लावा.
- ही भांडी धुण्यासाठी साबण वापरू नका. साफ करण्यासाठी मिठाचा आणि लिंबाचा वापर करा.
मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे.
- या भांड्यात शिजवलेल्या अन्नात १००% पोषक घटक असतात. मातीचे भांडे अन्नातील लोह, खनिज इ. पोषक घटक टिकवून ठेवते.
- मातीच्या भांड्यातील अन्न पचण्यास हलके असते. ही भांडी अन्नातील ph मूल्य टिकवून ठेवतात. त्यामुळे अनेक रोगांपासून बचाव होतो.
- मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना टेल कमी लागते.
























































