healthy पाणीपुरी

आपल्या सर्वांनाच पाणीपुरी खायला प्रचंड आवडते. मुंबईची चाट म्हणजे पाणीपुरी. पाणीपुरी हा पदार्थ कॉलेजच्या गॅदरिंगपासून, घरच्या घरी बनवण्यापर्यंत ते अगदी लग्नात खाण्यापर्यंत सगळ्यांनाच आवडतो. पाणीपुरी खाण्याचा अनेक फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. . तेव्हा जाणून घेऊया की पाणीपुरीचे आरोग्यदायी फायदे काय आणि तोटे काय? पाणीपुरीमध्येही आता अनेक प्रकारच्या स्टाईल्स आल्या आहे. पण तरीसुद्धा आपल्यालाही आवडते ती ऑथेंटिक पाणीपुरी. अनेकांदा जास्त तिखट आवडते तर अनेकांना कमी तिखट आवडते. हल्ली अति गोड पाणीपुरी खाण्याचाही ट्रेण्ड वाढला आहे. त्यातून रगडा पुरी, सेव पुरी, दही पुरी, गोड पाणीपुरी असे अनेक प्रकारही आपल्याला यावेळी आजमावता येतात.

पाणीपुरीचे फायदे काय आहेत?
पाणीपुरीचे असे फायदे आहेत की यामुळे गॅसची समस्या नष्ट होते. त्याचबरोबर एसिडिटीही कमी होते . पाणीपुरीमुळे आपले पचन चांगले होते. पाणीपुरीत असलेल्या पदार्थांचा फायदा आपल्या शरीरसाठी चांगला आहे कारण त्यातून कार्ब आणि फायबरचा लाभ मिळतो. पाणीपुरीतल्या पाणी जलजिरा, पुदिना, जिरे, धने आणि काळं मीठ असते. त्यामुळे तुम्हाला अपचन आणि एसिडिटीचा त्रास होत नाही. सर्वात मह्त्त्वाचे कारण म्हणजे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी आणि उकडलेले पदार्थ असल्यानं त्यानं तुम्हाला माफक कॅलरीज मिळतात आणि त्यानुसार आपले वजनही कमी होते.

काय आहेत तोटे?
पाणीपुरीतील पुऱ्या जर का अधिक कडक असतील तर त्यामुळे तुमच्या घशालाही त्रास होऊ शकतो अशा वेळी तुम्हाला योग्य ती काळजी घेणे बंधनकारक ठरते. बाहेरची पाणीपुरी खाल्ल्याने तिच्या स्वच्छतेवरही प्रश्नचिन्ह असते. एकतर त्यातील अस्वच्छ पाण्यामुळे तुम्हाला काही रोग होण्याची शक्यता असते तेव्हा त्यातूनही जर का त्यातील पदार्थ हे नीट उकडले गेले नसतील तर त्यानंही तुमचे पोट बिघडू शकते.