ट्रेंड – दास काकांना आगळावेगळा निरोप!

शाळेतील शिपायाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बंगळुरूमधील बिशप कॉटन स्कूलमधील शिपाई 38 वर्षांच्या सेवेनंतर शेवटची घंटा वाजवताना दिसत आहे. हाच घंटा वाजण्याचा आवाज गेली कित्येक वर्षे विद्यार्थ्यांच्या मनात घुमत होता, ज्यामुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये एक भावनिक क्षण पाहायला मिळाला. दास काकांना निरोप देताना विद्यार्थी भावुक झाले. दास काकांसाठी त्यांनी टाळ्या वाजवल्या. इन्स्टाग्रामवर एका युजरने शेअर केलेल्या या व्हिडीओला 1 कोटी 90 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. ‘शाळेतील प्रत्येक सकाळ संस्मरणीय बनवणारा हा माणूस. त्यांचे हास्य, त्यांचे शांत भाव, त्यांची उपस्थिती – हे सर्व शाळेच्या हृदयाच्या ठोक्यांचा भाग होते’, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.