भाजपचं गुजरात मॉडेल पावसात गेलं वाहून ! पुरामुळे तिघांचा मृत्यू; हजारो विस्थापित

भाजपचे राज्य असलेल्या गुजरातमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूर आला असून आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक विस्थापित झाले आहे. शहरी भागात अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांना नदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोरबी जिल्ह्यात हलवड तालुक्यात एक ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यातून वाहून गेला. यात सात प्रवासी होते. गेल्या 20 तासांपासून त्यांचा शोध सुरू आहे पण त्यांचा पत्ता लागलेला नाही. मुसळधार पावसामुळे वडोदरा, आनंद, खेडा आणि पंचमहल जिल्ह्यात पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

छोटा उदेपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर 56 वर भारज नदीवरचा पूल कोसळला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीला फटका बसला आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पावसामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पावासाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 99 जणांचा मृत्यू झाला आहे.

एनडीआरआफने आतापर्यंत 1 हजार 653 नागरिकांना वाचवण्यात आले आहे. तर 17 हजार 827 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी राज्यात एनडीआरएफच्या 13 तर एसडीआरएफच्या 22 टीम राज्यात कार्यरत आहे.