मुंबईला पावसाने झोडपले, उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरेंसह आयुक्तांनी केली पाहणी

mla-aaditya-thackeray

मुंबईत अतिवृष्टीमुळे विविध सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ठिकठिकाणी असलेले उदंचन केंद्र तसेच पंप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहेत.

वांद्रे-धारावी रस्त्यालगत, ड्राइव्ह इन थिएटर लगतच्या परिसराची तसेच तेथे असलेल्या पर्जन्य जल उदंचन केंद्राची राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.

यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पालकमंत्री ठाकरे यांना परिस्थितीची आणि करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. याप्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि उपायुक्त (पायाभूत सुविधा) संजय दराडे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या