जालन्यात दोन तास पावसाची तुफान बॅटिंग, रस्ते जलमय, अनेकांच्या घरात पाणी शिरले

दुपारी दोन वाजेच्या सुमारास विजेचा कडकडाटासह जालना शहरासह परिसरात तुफान पावसाने हजेरी लावली. यामुळे जालन्यातील मुख्य रस्ते जलमय झाले होते. अनेकांच्या वाहनात, तसेच सखल भागातील घरात पाणी शिरले होते.

आज दुपारी दोन वाजेनंतर थोड्याफार रिमझिम पावसाला सुरुवात झाली अन् बघता बघता पावसाने जोर धरत टपोर थेंबांचा मारा करीत धो-धो कोसळण्यास सुरुवात झाली. या पावसाने शनिमंदिर, गांधीचमन, टाऊनहॉल, मोतीबाग रोड, भाग्यनगरनाला, बसस्थानक परिसर, शिवाजी पुतळा, मस्तगड परिसरात उथळ रस्त्याने जोरदार पाणी वाहत असल्याने वाहने चालविणे कठीण झाले होते. त्यामुळे नागरिकांनी आपले वाहने जागेवरच सोडून इतर ठिकाणी आडोशा घेतला. परंतु अनेकांच्या वाहनात पाणी गेल्याने मोठी पंचाईत होऊन बसली होती. तसेच या भागात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.

आपली प्रतिक्रिया द्या