जालना जिल्ह्यातील सुखना नदीला चौथ्यांदा पूर; रोषणगाव, रोहिलागडला अतिवृष्टीचा तडाखा

592

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील रोषणगाव व रोहिलागड मंडळात या वर्षी चौथ्यांदा अतिवृष्टीचा तडाखा बसला असून नानेगाव परिसरातून वाहणाऱ्या सुखना नदीला या पावसाळयात तिसऱ्यांदा पूर आला आहे. तर पाचोड –बदनापूर रत्यावरील निर्माणाधीन पुलाजवळील तात्पुरत्या पुलावरून पाणी वाहल्याने या भागातील गावाचा संपर्क तुटला असून पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.

बदनापूर तालुक्यातील काही मंडळात या वर्षी पावसाने कहर केला असून तालुक्यातील रोषणगाव व रोहिलागड या मंडळात या पावसाळयात चौथ्यांदा अतिवृष्टीची नोंद झाली. गेल्या 24 तासात रोषणगाव मंडळात 76 मिमी तर बदनापूर मंडळात 77 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वीही दोनवेळा झालेल्या अतिवृष्टीमुळे रोषणगाव व रोहिलागड या भागातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भागातील उरली सुरली पिकेही नष्ट झाली असून पावसाने शेतकऱ्यांच्या खरीपाच्या आशाच धुळीस मिळवल्या आहेत. त्याचप्रमाणे सुखना नदीलाही या मोसमात चौथ्यांदा पूर आला. या नदीवरील नानेगाव येथे पाचोड ते बदनापूर या रस्त्यावर नव्याने पूल उभारण्यात येत असल्याने या ठिकाणी केलेला तात्पुरता पूल पुन्हा एकदा वाहून गेला. या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे या भागाचा संपर्क तुटला असून या बाजूच्या गावांना जाण्याची मोठी अडचण उभी राहत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या