कुठे रिमझिम तर कुठे जोरदार, मुंबईत पावसाची बॅटिंग सुरूच

406

गेल्या आठवड्याच्या शेवटी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सलग तीन दिवस मुंबई-ठाणे परिसराला धुवून काढलं. यानंतर पावसाचा वेग कमी झाला असला तरी अधून मधून हजेरी सुरूच आहे. मंगळवारी मध्य मुंबईसह पश्चिम उपनगरात पावसाने चांगली हजेरी लावली. दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान सुरू झालेला पाऊस तास – दीड तास कोसळला. पश्चिम उपनगरात दहिसर, मालाड, बोरिवली या भागात जोरदार पाऊस झाला. तर अन्य भागात देखील पावसाने रिप रिप सुरू ठेवली होती.

आपली प्रतिक्रिया द्या