मुंबईत आजही मुसळधार, हवामान विभागाचा रेड अलर्ट

476
प्रातिनिधिक फोटो

कोकणासह मुंबईत आज मुसळधार पाऊस झाल्यानंतर आजही रेड अलर्ट जारी करण्यात आला असून रविवारी, मात्र, शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, मुंबईत आज झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईत दोन तर पश्चिम उपनगरात १ अशा तीन ठिकाणी घर पडल्याच्या आणि भिंत खचल्याचा घटना घडल्या तर मुंबईत १०, पूर्व उपनगरात ५ तर पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण २४ ठिकाणी झाडे, फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. फांद्या हटवण्याचे काम सुरू असून सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. शॉर्टसर्किटच्या ९ घटना तर वरळीत दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र, यात कोणीही जखमी झाले नाही. मुंबई आणि उपनगरातील वाहतूक व्यवस्था काही वेळासाठी विस्कळीत झाली.

आपली प्रतिक्रिया द्या