रत्नागिरी तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद; 2 तासात 9 इंचापेक्षा जास्त पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहर आणि परिसरात शुक्रवारी सायंकाळनंतर मॉन्सूनच्या पहिल्याच विक्रमी पावसाची नोंद झाली. अवघ्या दोन तासात रत्नागिरीत 237 मिलीमीटर पाऊस पडला. यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले होते.

नैऋत्य मोसमी पावसाचे रत्नागिरी जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये कमी अधिक पाऊस पडत आहे. जिल्ह्यात शुक्रवारी सर्वाधिक पाऊस रत्नागिरी तालुक्यात 237 मिलीमीटर नोंदला गेला. त्याखालोखाल राजापूर तालुक्यात 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर मंडणगडमध्ये 12 ,दापोली 33, खेड 9, गुहागर 58, चिपळून 33, संगमेश्वर 28, रत्नागिरी 237, लांजा 59 आणि राजापूर 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.