देशभरात पावसाने थैमान घातले आहे. उत्तराखंडमध्ये दरड कोसळली आहे, तर केरळमध्ये भुस्खलन झाले असून अनेकांचा जीव गेला आहे. मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबईला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सातारा आणि पुण्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईत ढगाळ वातावरण राहिल तसेच कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 25 अंश असेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
पुढच्या काही दिवसांत मुंबईत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शनिवारी मुंबईत मुसळधार पाऊस पडला होता. आज रविवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या सोमवारी मुंबईत ढगाळ वातावरण राहिल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.