
मुंबईच्या उपनगरांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसत असताना वीकेंडलाही संपूर्ण मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हवामान खात्याने नागरिकांना खबरदारीचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. शिवाय 27 आणि 28 सप्टेंबर या दिवशी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या वर्षी मुंबईमध्ये मेअखेर जोरदार पाऊस सुरू झाला. वेळेआधी पडलेल्या या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले होते. हवामान खात्याच्या नोंदीनुसार गेल्या साडेतीन महिन्यांत शहर विभागात 96 टक्के तर पूर्व आणि पश्चिम उपनगरात 106 टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सांताक्रुझ केंद्रावर 125 टक्के पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी मुंबईत एकूण 95 टक्के पाऊस झाला होता, तर मुंबईत गेल्या काही दिवसांपासून विशेषतः उपनगरांमध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.
            
		





































    
    





















