महायुतीमध्ये मोठय़ा प्रमाणात बंडखोरी पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी सुटलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात माजी खासदार हीना गावित यांनी बंडखोरी केली आहे. शिंदे यांनी या मतदारसंघातून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी दिली आहे, परंतु आता त्यांच्या विरोधात हीना गावित यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.