
दुचाकीस्वारांना आता भारतीय मानक ब्यूरोने (बीआयएस) प्रमाणित केलेली हेल्मेट वापरणे अनिवार्य केले जाणार आहे. दुचाकींच्या अपघातात होणारे मृत्यू हे देशात सर्वाधिक आहेत. ते रोखण्यासाठीच केंद्र सरकार हे पाऊल उचलत असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिली. बीआयएस हेल्मेट वापरणे अनिवार्य केल्यानंतर देशात दुचास्कारांसाठी फक्त बीआयएस प्रमाणित हेल्मेटची निर्मिती आणि विक्री होणार आहे. दुचाकींच्या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन होणारे मृत्यू टाळण्यास ही हेल्मेट फायदेशीर ठरतील असा रस्ते वाहतूक मंत्रालयाला विश्वास आहे. त्यासंदर्भात मंत्रालयाने संबंधित विभागांकडून मते मागवली आहेत.

























































